@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important news for those who have accounts in private banks like ICICI and HDFC ] : ICICI व HDFC ह्या बँका खाजगी क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक बँका आहेत . भारताच्या अर्थव्यवस्थेत ह्या दोन बँकाचा मोठा वाटा आहे .
ICICI व HDFC या दोन्ही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा चार्जमध्ये वाढ केली आहे . सदरची वाढ ही दिनांक 01 जुलै पासुन लागु केली जाणार आहे . दिनांक 01 जुलै पासुन काही सुविधांना अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार आहे .
बँकेमार्फत विविध सुविधा दिल्या जातात , जसे कि एटीएम , वॉलेट , क्रेडिट कार्ड अशा सुविधा दिल्या जाता , आता सदर सुविधांच्या चार्जेस मध्ये वाढ लागु करण्यात येणार असल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण येणार आहे .
थर्ड पार्टी वॉलेट व्यवहार , क्रेडीट कार्ड वापर तसेच IRCTC व्यवहार व ATM शुल्क संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत . यांमध्ये थर्ड पार्टी वॉलेटच्या माध्यमातुन 10,000/- रुपये पेक्षा अधिक रुपयांचा व्यवहार केल्यास आपणांस 01 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ;
याशिवाय 15,000/- रुपये पेक्षा अधिक रुपयांचे इंधन व्यवहारावर 01 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे . तसेच 50,000/- रुपये पेक्षा जास्त Utility bill पेमेंट वर 01 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे .
ATM : एटीएमची व्यवहार ( Transaction ) लिमिट संपल्यानंतर अतिरिक्त चार्ज द्यावे लागणार आहेत . यांमध्ये ATM चे 03 व्यवहारचे लिमिट संपल्यानंतर 23/- रुपये प्रति व्यवहारासाठी चार्ज लागणार आहे . यापुर्वी हे दर 21/- रुपये इतके होते .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !