State Employee : सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास , राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार 4 हजार कोटी रुपये !

Spread the love

@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee news ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी करत आहेत , या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत  सकारात्मक बैठक देखिल झालेली आहे . बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते .

निवृत्तीचे वय वाढविल्यास , राज्य सरकारचे 4 हजार कोटी वाचणार : राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 हजार पदे भरण्याचा निर्धार केला होता , परंतु अद्याप पर्यंत राज्य शासन सेवेत 40,000 पदांची भरती करण्यात आलेली आहे . यामुळे राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत . जर राज्य शासनांने निवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास राज्य शासनांचे दरवर्षी 4 हजार कोटी रुपये वाचतील असा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे .

सुधारित आकृतीबंध : मागील वर्षी राज्यातील विविध विभागामध्ये सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आलेला आहे , या सुधारित आकृतीबंधानुसार बऱ्याच विभागांमध्ये अद्याप पदभरती करण्यात आलेली नाही . यामुळे रिक्त पदांचा आकडा मागील वर्षापेक्षा यावर्षी मोठा आहे .

दरवर्षी राज्य शासन सेवेतुन 50 ते 60 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात , यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना प्रतीवषी 60 लाख निधी द्यावा लागतो , यामुळे दरवर्षाला राज्य सरकारला 60 हजार कर्मचाऱ्यांचा विचार केला असता दरवर्षाला तीन हजार 600 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा येईल . यामुळे निवृत्तीचे वय वाढविल्यास हा 4 हजार कोटींचा बोजा वाचणार असल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे .

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यास कोणाचा विरोध : राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनाकडून तसेच काही आमदारांकडून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यास विरोध दर्शवला आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment