@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ rain Update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ( दिनांक 30 जून पर्यंत ) 22जिल्ह्यांना तुफान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
आज दिनांक 25 जून 2025 पासून दिनांक 30 जून पर्यंत राज्यातील मुंबई , पुणे अशा प्रमूख शहरासह 22 जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे .
आज दिनांक 25 जून रोजी राज्यातील रत्नागिरी , रायगड , ठाणे , पालघर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय नाशिक घाट , पुणे , सातारा , कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
दिनांक 25 ते 30 जून या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रावरून पुढे वाटचाल करणार असल्याने , महाराष्ट्र राज्यसह उत्तरेकडे राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
यामध्ये राज्यातील नांदेड , परभणी , जालना , हिंगोली , छत्रपती संभाजीनगर , जळगाव , नाशिक , धुळे , नंदुरबार याशिवाय विदर्भातील सर्व जिल्हे तसेच कोकणातील मुंबई , सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता पुढील चार दिवसात वर्तवण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर सातारा, पुणे , सांगली, कोल्हापूर , अहिल्यानगर , सोलापूर ,लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !