@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ How many SIM cards are there in your name? Check and delete the SIMs you don’t have with one click ] : आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर्ड आहेत , जर आपल्या वापरातील सिमकार्ड नसेल तर दुरसंचार विभाग मार्फत लाँच करण्यात आलेल्या ॲप्सच्या माध्यमातुन सदर सिमकार्ड बंद करु शकता .
आजच्या आधुनिक युगामध्ये अनेक फ्रॉड होत आहेत . यांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने सिमकार्ड घेवून , गुन्हा घडण्याचे प्रमाणे अधिक आहे . यामुळे आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत , हे चेक करुन वापरात नसणारे सिमकार्ड बंद करणे आवश्यक आहे .
संचार साथी : भारतीय दुरसंचार विभाग मार्फत संचार साथी हे ॲप्स लाँच करण्यात आलेले आहेत , त्या ॲप्सच्या माध्यमातुन आपणांस आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत , ते पाहता येणार आहेत . तर जे सिमकार्ड आपण वापरत नसाल किंवा आपण न घेतलेले सिमकार्ड ..
एका क्लिकवर डिलिट करु शकता . याकरीता आपणांस Play Store वरुन संचार साथी ( Sanchar Sathi ) हे ॲप्स डाऊनलोड करुन घ्यावे लागणार आहे . त्यांमध्ये आपणांस त्यांमध्ये आपणांस पाच प्रकारच्या सेवा पाहण्यास मिळतील ..
हे पण वाचा : गट ड संवर्गातील 500+ जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
त्यापैकी आपल्या नावावर किती सिम आहेत , Know Mobile Connections in Your Name या ऑप्शनवर क्लिक करावे , त्यानंतर आपणांस आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत , ते दिसतील . त्यामध्ये जे नंबर आपल्या वापरात नसेल किंवा आपण घेतलेच नसेल अशा सिमकार्डवर क्लिक करुन Not My Number , Not Required या ऑप्शनवर क्लिक करावेत .
त्यानंतर ते सिमकार्ड आपल्या नावारुन कमी होईल , व जो कुणी सदर सिमकार्ड वापरत असेल , त्यांना परत व्हेरिफिकेशन करावे लागेल . ज्यामुळे सदर सिमकार्ड आपल्या नावावरुन वापरत असणाऱ्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर्ड होईल .
याशिवाय आपणांस सिम हरविले किंवा चोरी झाल्यास ब्लॉक करण्याचा ऑप्शन मिळतो . याशिवाय आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉलसला रिपोर्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे .
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !