@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) were issued on 01 July regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.मोटार वाहन खरेदी अग्रिमे : सरकारी कर्मचारी इत्यादींना कर्जे , मोटार वाहन खरेदी अग्रिम , मोटार वाहन खरेदी अग्रिमे याकरीता सन 2025-26 या आर्थिक वर्ष करीता मंजूर अनुदानामधून अधिकारी / कर्मचारी यांना मोटारकार खरेदी करण्याकरीता निधीची मंजूरी देण्यात येत आहे .
सदर निर्णयात नमुद अधिकारी /कर्मचारी एखाद्या मंजूरी / नियंत्रक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातुन बदलून दुसरीकडे गेले असल्यास , शासनांस कळविणे आवश्यक असेल , त्या – अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
02.शासकीय कर्मचारी इ. कर्जे : शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम या प्रयोजन करीता अनुदानाचे वाटप करण्याकरीता विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 02 जुलै रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार निर्णयांमध्ये नमुद अधिकारी / कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम या प्रयोजन करीता एकुण 2,53,17,000/- रुपये इतका निधी अटी / शर्तींच्या अधिन राहून मंजूर करण्यात येत आहे .
हे पण वाचा : मुदतपूर्व सेवानिवृत्ती बाबत महत्त्वपूर्ण GR निर्गमित दि.01.07.2025
03.अधिकारी / कर्मचारी वेतन : जुन 2025 चे वेतन अदा करण्याकरीता महिला व बाल विकास विभाग मार्फत GR निर्गमित करण्यात आलेला असून , यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे माहे जुन 2025 चे वेतन अदा करण्याकरीता ..
सन 2025-26 या वर्षी 327 कोटी रुपये इतका मंजूर निधी मधून 50 कोटी रुपये वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील तिन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025