@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Class IV employees stage a protest march at the Commissionerate; Know the detailed demands ] : राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे नाशिक आयुक्तालयावर दिनांक 28 जुलै 2025 रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे .
सदर आंदोलन हे महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने , सीटुचे राज्य अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल कराड यांच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब नाशिक येथून नाशिक आयुक्तालय पर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे .
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या ? : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आकृतीबंध रद्द करण्यात यावा , सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात कामावर असणाऱ्या सर्वच रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR )
कंत्राटी शिक्षक पदभरती बंद करावे व तासिक तत्वावर काम करणाऱ्या सर्वच शिक्षकांना कामावर घेवून कायम करावेत . खाजगीकरण पद्धतीने शिक्षक पदभरतीचा शासन निर्णय मागे घेण्यात यावा .
- स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेली दिर्घ सुट्टी रद्द करण्यात यावी .
- महिला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रात्री मुलींच्या सोबत झोपण्याची सक्ती बंद करण्यात यावी .
- विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ सकाळी 11.00 वाजता करुन चतुर्थ कर्मचाऱ्यांना 8 तास काम द्यावे .
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बक्षी समिती खंड – 02 च्या शिफारशी लागु करण्यात यावी .
- मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना व लाड -पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगार कर्मचाऱ्यांच्या वारसांना कायम सेवेत घेण्यात यावे .
अशा प्रमुख मागणींसाठी दिनांक 28.07.2025 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे .
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती …
- राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह सहावा वेतन आयोगापासुन थकबाकी रक्कम मिळणार ; जाणुन घ्या वित्त विभाग परिपत्रक ..
- मोठी बातमी : राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरणांच्या अंमलबाजवणीस अखेर मंजूरी ; GR दि.15.12.2025
- नविन वेतन आयोगात किमान 20% पगारवाढ मिळणार ; जाणून घ्या आकडेवारी ..