10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत GR निर्गमित दि.26.12.2025

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding regularization of services of contractual employees who have completed 10 years and more of service ] : 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करणेबाबत , सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.26.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणाऱ्यांपैकी कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत समावेशन करणेबाबत आरोग्य विभागाच्या दि.14.03.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत ..

कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या वाहन चालकांच्या सेवा ह्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित करणेबाबत दिनांक 04.12.2024 नुसार शासन आदेश निर्गमित करण्यात येत आहेत .

यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन केल्याच्या नंतर त्यांचे वेतन निश्चिती करताना त्यांना सध्या मिळणारे मानधन व त्यावर एक वेतनवाढ मिळवून नियमित वेतनश्रेणी मधील पुढील टप्यावर निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन केल्याच्या नंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या मानधन ऐवढे नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर वेतन निश्चितीला संबंधित कार्यालय प्रमुखांनी मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment