@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 26.12.2025 regarding payment of special salary ] : विशेष वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 26.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्ते विशेष शिक्षकांचे वेतन अदा करणेकरीता रुपये 04,01,64,806/- इतका निधी त्याचबरोबर अपंग समावेशित शिक्षण ( माध्यमिक स्तर ) योजना अंतर्गत शासन स्तरावरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या…
161 पैकी 05 विशेष शिक्षकांच्या थकित वेतनाच्या रकमेतील तफावतीनुसार अदा करावयाची फरकाची रक्कम रुपये 20,13,188/- इतका निधी असा एकुण रुपये 22,42,59,729/- इतका निधी हा शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना उपलब्ध करवून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
तसेच विशेष शिक्षकांना अदा करावयाच्या वेतनाची रक्कम मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार जमा करणेबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच विशेष शिक्षकांच्या वेतनाकरीता आवश्यक असणाऱ्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुर्ण यांना तपासणीच्या अधिन राहून निधी वितरणांस मान्यता देण्यात येत आहे .
तसेच याबाबत अनियमितता अथवा दिरंगाई होणार नसल्याचे सुचति करण्यात आले आहेत . व वेतन / मानधन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहील्यास त्याबाबतचा अहवाल शासनांस सादर करुन , शिल्लक निधीचा विनियोग करण्यापुर्वी शासनाची पुर्वमान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- विशेष वेतन अदा करणेबाबत GR निर्गमित दि.26.12.2025
- 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत GR निर्गमित दि.26.12.2025
- राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतननिश्चिती पुढील टप्यावर करणेबाबत वित्त विभाग मार्फत GR निर्गमित दि.19.12.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती …
- राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 3% ( 58% प्रमाणे ) डी.ए चा लाभ जानेवारी वेतन / पेन्शन देयकासोबत ..