राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित दि.02.02.2026

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Very important Government Decision (GR) regarding state employees issued on 02.02.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 02.02.2026 रोजी वित्त विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 01.01.2026 ते दिनांक 31.12.2026 या कालावधीमध्ये राज्य शासकीय गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांस बचत निधीचे लाभ प्रदान करण्यासाठी परिगणतीय तक्ता सदर निर्णयांमध्ये जोडण्यात आलेला आहे .

सदर दर्शविण्यात आलेल्या प्रति युनिटकरीता बचत निधीची संचित रक्कम प्रदान करण्यात यावी , असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच मंत्रालयातील सर्व विभाग तसेच मंत्रालयीन विभागांना प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुखांनी ..

दिनांक 01.01.2026 पासुन राजीनामा , सेवानिवृत्ती अथवा सेवेत असताना मृत्यु पावल्याने व इतर काही कारणाने गट विमा योजनेचे सभासदत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना / अधिकाऱ्यांच्या वारसांना सदर नमुद देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदर योजना मधील संचित रकमांवर दिनांक 01.01.2026 पासुन दर साल दर शेकडा 7.1 टक्के दराने व्याज आकारण्यात आले आहेत . राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या विमा निधीमधील संचित रकमांवर दर साल दर शेकडा 4 टक्के दरात कोणताही बदल झालेला नसल्याने याच दराने विमा निधीमधील संचित रकमांवर व्याजाची आकरण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता …

WhatsApp Group Join Now

Leave a Comment