Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding taking action in accordance with Universal Transfer 2026 ] : सार्वत्रिक बदल्या 2026 च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत , आदिवासी विकास आयुक्तालय मार्फत दि.27.03.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 अधिसुचित करण्यात आला आहे , या नियमातील नियम 3 व 4 नुसार विभागातील 06 वर्षे पुर्ण झालेल्या वर्ग – 3 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबतची ..
कार्यवाही एप्रिल – मे 2026 मध्ये करण्यात येते . सन 2026 च्या सार्वत्रिक बदल्या सुरळीत पार पाडण्याकरीता खाली नमुद काही नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये संबंधित संवर्गातील कार्यरत पदांच्या 30 टक्के च्या मर्यादेत बदली पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची ज्येष्ठतानुसार यादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात यावी . व बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीचे विभाजन करुन अवघड क्षेत्रातील बदली व बिगर अवघड क्षेत्रातील बदली पात्र कर्मचाऱ्यांची दोन स्वतंत्र याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये 30 टक्के बदली पात्र यादीतील कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतानुसार , समुपदेशनाद्वारे पसंतीक्रम निवडीकरीता प्राधान्य देण्यात येवून त्यानुसार – बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी ( वर्ग – 3 व वर्ग 4 ) यांची दिनांक 30.03.2026 पर्यंत यादी प्रसिद्ध करण्यात यावी व सदर यादीच्या अनुषंगाने दिनांक 05.04.2026 पर्यंत आक्षेप घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर आक्षेपांचे दिनांक 07.04.2026 पर्यंत निवारण करुन बदली पात्र यादी अंतिम करुन प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच मुख्याध्यापक , शिक्षक , अधिक्षक व अधिक्षिका यांचे दिनांक 04.05.2026 नंतर समुपदेशन घेवून दि.10.05.2026 पुर्वी स्थानांतरणाची संपुर्ण प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .


- दि.30 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत राज्यातील या भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता ..
- सार्वत्रिक बदल्या 2026 च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.27.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल देय मे 2026 वेतन अदा करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.03.2026
- SBI मध्ये खाते असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास SBI एक्सप्रेस क्रेडिट (Xpress Credit) योजना .
- मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.24.03.2026