Bajaj Finserv EMI Card : मित्रांनो आता आपण आपल्याला लागणाऱ्या काही गरजेच्या वस्तू जसे की मोबाईल टीव्ही फ्रिज यासोबतच इतर घरगुती कोणत्याही वस्तू असतील त्या कोणत्याही चिंता न करता आपल्याला सहजपणे क्रेडिट कार्ड वरती घेता येतील.
तुम्हाला माहित आहे का? Bajaj Finserv EMI Card हे एक ऑनलाईन प्रकारचे डिजिटल क्रेडिट कार्ड आहे. या माध्यमातून तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत. ऑनलाइन खरेदी करायचे असेल तर नक्कीच तुम्ही याचा उपयोग करू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड मिळवण्याकरिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय देखील करू शकता.
मित्रांनो आता Bajaj Finserv च्या माध्यमातून भारत देशातील सर्व शहरांमध्ये या सोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे कार्ड वापरण्यासाठी लागू केले आहे.
हे कार्ड घेण्याकरिता सर्वात प्रथम एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी ऑप्शन दिसेल. त्यावर तुमचे वय हे 21 ते 60 वर्षापर्यंत असावे. यासोबतच तुमच्याकडे एक रेग्युलर असा सोर्स ऑफ इन्कम असावा. अशावेळी तुम्हाला Bajaj Finserv EMI Card अगदी सहजपणे प्राप्त होईल.
मित्रांनो हे कार्ड घेण्याकरिता तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला नक्कीच हे कार्ड मिळेल.
हे कार्ड घेण्याकरिता सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागेल. या सोबतच पॅन कार्ड देखील लागणार आहे. त्यानंतर पुढे तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आयएफसी कोड इत्यादी जी काही माहिती असेल ती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागेल.
तुमचे जे काही आधार कार्ड असेल त्याला तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे. यासोबतच तुमचे आधार प्रमाणे करणे आणि पुढे अकाउंट व्हेरिफिकेशन देखील केले जाईल.
Bajaj Finserv EMI Card काढण्याची एक सोपी प्रोसेस आहे…
तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल बजाज फायनान्स ईएमआय कार्डवर नक्की तुम्ही काय काय गोष्टी खरेदी करू शकणार आहे? तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट, फ्रिज, कुलर, टीव्ही, मोबाईल इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी गोष्टी तुम्हाला अगदी सहजपणे खरेदी करता येथील.
विशेष बाब सांगायची झाली तर ॲमेझॉन फ्लिपकार्ड यासारख्या नामांकित ई-कॉमर्स वेबसाईटवर तुम्ही हे कार्ड सहजपणे चालू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन वरून तुम्ही सहजपणे खरेदी करू शकता.