शासकीय कर्मचाऱ्यांना इथून पुढे अधिक पेन्शन मिळवण्यासाठी जी काही अंतिम मुदत निश्चित केली होती त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जे कोणी कर्मचारी असतील त्यांना त्यासोबतच पेन्शन धारक व्यक्तींना अंतिम मुदतीच्या अगोदरच अर्जाची प्रक्रिया करावी लागेल.
EPFO Higher Pension Update :
केंद्र शासनाच्या माध्यमातून मागील महिन्यामध्ये कर्मचारी यांच्या डीए मध्ये मोठ्या तऱ्हेने वाढ करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो कर्मचारी यांचा महागाईचा भत्ता वाढणार आहे. सध्या बेचाळीस टक्के इतका कर्मचाऱ्यांच्या डीए झाला असून त्यांच्या पगारामध्ये सुद्धा तितकीच वाढ होईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी यांच्या संघटनेच्या अंतर्गत कर्मचारी खातेदारकांकरिता एक महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आली आहे. ज्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की, जर तुम्हाला अधिक टेन्शन मिळवायचे असेल तर कर्मचारी व पेन्शनधारकांनी त्वरित अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. हा अर्ज तीन मे पर्यंत स्वीकारला जाईल. तिथून पुढे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत…
EPFO माध्यमातून पेन्शनधारक व कर्मचारी या सर्वांना अधिक पेन्शन मिळवायचे असेल तर अर्ज करायची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 03 मे 2023 अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे EPFO कडून या अगोदरच सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन मिळवायचे असेल तर याची मदत पूर्वी तीन मार्च दिली होती. परंतु यात वाढ केली आहे.
कर्मचारी व पेन्शनधारक नागरिक असतील त्यांना पेन्शन मिळवायचे असेल तर अर्ज करावयाचा आहे. जर कर्मचाऱ्यांना अर्ज करायचा असेल तर EPFO अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. या योजनेच्या माध्यमातून 2014 सप्टेंबर पूर्वी जे नागरिक सेवानिवृत्त झाले होते अशा कर्मचारी व्यक्तींना पेन्शनचा लाभ मिळवून देण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालय समितीने 4 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या अधिकृत आदेशामध्ये असे सांगितले होते की जे कोणी पात्र सदस्य असतील त्यांना हा पर्याय वापरायचा असेल तर चार महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे. त्याची जी काही अंतिम तारीख आहे ती तीन मार्च 2023 पर्यंत निश्चित केली होती परंतु EPFO याची अंतिम तारीख वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता ही तारीख वाढवून तीन मे 2023 निश्चित केली आहे.
सध्या हाती आलेल्या नियमावलीनुसार पेन्शनची कमाल मर्यादा ही फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपये निश्चित केली असून समजा एखाद्या व्यक्तीचा पगार हा प्रति महिना 50 हजार रुपये इतका असेल, तर त्याला फक्त दहा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि अशी संधी त्यांना प्राप्त होईल.
जी काही रक्कम असेल ती जमा करायची मर्यादा पुढे वाढवली असून आता EPFO सदस्यांनी 2014 च्या 1 सप्टेंबर पर्यंत जे काही मूळ वेतन होते. त्यांच्या 8.33% रक्कम असेल ती जमा करून अधिक पेन्शनचा लाभ सहजपणे मिळू शकतात.
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024