मंत्रीमंडळ निर्णय : दि.13 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 13 aug 2024 ] : राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , सदर बैठकीत 08 महत्वहपुर्ण निर्णय घेण्यात आले , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकासाला चालना : राज्यातील विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकासाला अधिक चालना मिळावा याकरीता राज्य शासनांकडून दुग्ध विकास प्रकल्पासाठी 149 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे . या अंतर्गत राज्यातील अकोला , अमरावती , लातुर , नागपुर , चंद्रपुर , भंडारा , गोंदिया , वर्धा , बुलढाणा  , यवतमाळ , वाशिम , गडचिरोली , छ. संभाजीनगर , बीड , जालना , हिंगोली , धाराशिव , परभणी या जिल्ह्यांमध्ये सदर दुग्ध विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहेत .

डेक्कन कॉलेज , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ , गोखले संस्था कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना : वरील नमुद संस्था / विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना लागु करणेबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे . सदर संस्था ह्या शासनांच्या अधिपत्याखाली आहेत .

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलत : यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीकरीता नोंदणीची अट मध्ये शिथिल करण्यात आली आहे , यानुसार 27 अश्वशक्तीपेक्षा अधिक परंतु 201 अश्वशक्तीपेक्षा कमी अशा यंत्रमागांना प्रति युनिट 75 पैसे त्याचबरोबर 27 अश्वशक्तीपेक्षा कमी भाराच्या यंत्रमागांना प्रति युनिट 01 रुपये अतिरिक्त वीज दर सवलत लागु करताना असलेली नोंदणीची अट शिथिल करण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे .

हे पण वाचा : राज्यात तब्बल 5000+ जागेसाठी महाभरती..

  • शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन म्हणून 70,000/- तसेच दुरस्थ क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी प्राध्यापक यांना 2 लाख तर सहयोगी प्राध्यापकांना 01 लाख 85 हजार मानधन देण्यास मान्यता देण्यात आली आहे .
  • 6 हाजर किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यास सुधारित 37 हजार कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे .
  • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम तसेच देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ,यामुळे लोखो नागरिकांना लाभ होणार आहे .
  • यापुढे नगर अध्यक्षांचा कालाधी हा अडीच वर्षे ऐवजी 5 वर्षे करणे करणेबाबत , निर्णय .
  • सौर उर्जा प्रकल्पांसाठी कर्ज करीता कैएफ डब्ल्यु कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय ..

Leave a Comment