घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding payment of House Rent Allowance (HRA) difference issued on 13.02.2026 ] : घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) मार्फत दि.13.02.2026 रोजी श्री.पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट ( शालार्थ सिस्टम ) महाआयटी मुंबई यांच्या महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25.02.2025 नुसार माहे जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के घोषित करण्यात आला आहे .

त्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार , वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 05.02.2019 नुसार महागाई भत्ताची रक्कम ही 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता ( HRA ) देय ठरतो .

तथापी थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध नसल्याने , तरी शासन निर्णय मभवा 1324 दि.25.02.2025 नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करुन देणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यामुळे ज्यांचे घरभाडे भत्ता फरक बाकी आहे , अशा कर्मचाऱ्यांना आता घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment