@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Comprehensive revised policy on compassionate appointment announced ] : राज्यातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जाहीर करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 17 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
अनुकंपा नियुक्तीचे उद्दिष्ट : शासन सेवेत कार्यरत असताना अधिकारी / कर्मचारी दिवंगत झाल्यास , त्यांच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतुन कुटुंबियांना सावरण्याकरीता , कुटुंबातील एकास अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यात येते .
सदर अनुकंपा नियुक्ती राज्यातील कोणास लागु आहे : सदर योजना ही राज्यातील गट अ ते गड ड संवर्गातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी लागु आहे . परंतु सदर योजना ही पती / पत्नी दोन्ही शासन सेवेत कार्यरत असल्यास अशा प्रकरणी सदर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही . त्याचबरोबर दि.31.12.2001 नंतर तिसरे अपत्य जन्मास आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास देखिल सदर अनुकंपा नियुक्ती दिली जात नाही .
कोणत्या पदांवर नियुक्ती दिली जाते ? : सदर अनुकंपा धोरणांनुसार गट क व गड ड संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जाते .
अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य व प्राधान्यक्रम :
प्राधान्यक्रम | नाते |
01. | पती / पत्नी |
02. | मुलगा / मुलगी ( अविवाहीत / विवाहीत ) , दत्तक / घटस्फोटित मुलगी / परित्यक्ता मुलगा / मुलगी / विधवा मुलगी / बहिण . |
03. | मुलगा हयात नसल्यास ,त्याची सुन |
04. | अविवाहीत भाऊ / बहिण |
वयोमर्यादा : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025