कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम पदावर समायोजन करुन घेणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.19.11.2024

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ contractual employee samayojana paripatrak ] : कंत्राटी तत्वावरील शिक्षकांची नियुक्त कायम पदावर समायोजन करण्यासाठी कागदपत्र पडताळणी करुन पात्र विशेष शिक्षकांची यादी सादर करणेबाबत ,राज्य प्रकल्प संचालक यांच्याप्रति , प्राथमिक शिक्षक संचालनालय यांच्यामार्फत दि.19.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की , दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायमस्वरूपी स्थायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे रिट याचिका दाखल झाली आहे . मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुपालन करण्याच्या अनुषंगाने राज्य पातळीवर विशेष शिक्षक या पदाचा नव्याने समावेश करून राज्यात सद्यस्थितीत उपलब्ध रिक्त शिक्षकीय पदांपैकी प्रत्येक केंद्रस्तरावर 01  याप्रमाणे 4,860 पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्ती करिता राखून ठेवण्यास आणि राखून ठेवण्यात आलेल्या रिक्त पदावर 2,984 विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजीच्या संदर्भातील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे .

तसेच सदर शासन निर्णय नुसार समायोजनाची कार्यवाही करण्याकरिता मा. आयुक्त शिक्षण यांनी दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी मान्य केलेल्या टिपणीनुसार , दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयात नमूद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत सद्यस्थितीत कार्यरत 2,572 विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून शासन निर्णयानुसार समायोजनास पात्र विशेष शिक्षकांची यादी सादर करण्याची निर्देश देण्यात आले आहेत .

हे पण वाचा : निवडणुकीत कर्मचाऱ्यांचा कल कोणाकडे ? जुनी पेन्शनचा (Old Pension) चा मुद्दा परत धुळीस जाणार ?

याकरिता कागदपत्र पडताळणी सूची यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 08 ऑक्टोबर 2024 नुसार विशेष शिक्षक पदावर समायोजनासाठी कागदपत्रांची पडताळणीची यादी बाबत खाली नमूद परिपत्रकामध्ये नमुद करण्यात आलेली आहे , याबाबतचा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत..

परिपत्रक (PDF)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment