@marathipepar दर्शना पवार प्रतिनिधी [ Employees’ protest in Delhi against NPS/UPS pension scheme. ] : केंद्र सरकारकडून एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना नविन एकीकृत पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे , सदर पेन्शनच्या विरोधात आता कर्मचारी आक्रमक भुमिका घेत , दिनांक 01 मे 2025 रोजी दिल्ली येथे महा-आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहेत .
कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकीकृत पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळतच नाही , अशी भुमिका घेत कर्मचाऱ्यांकडून दिनांक 01 मे 2025 रोजी महा-आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे .
NMPS संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सदर महा- आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत . दिनांक 01 मे 2025 रोजी जंतर मंतर येथे तब्बल 1 कोटी पेक्षा अधिक कर्मचारी सदर आंदोलनास उपस्थित राहणार असल्याची संभावना व्यक्त करण्यात आलेली आहे .
आंदोलनाचे नेतृत्व हे NMPS संघटनेचे अध्यक विजय कुमार व राष्ट्रीय महासचिव स्थित प्रज्ञा हे करत आहेत . याकरीता कर्मचाऱ्यांना सदर आंदोलनास येण्यासाठी संघटनेकडून आव्हान करण्यात आले आहेत .
एकीकृत पेन्शन योजनांमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन योजनाची हमी दिली तरी कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना पुर्ववत लागु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
- राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी ( कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदे भरणेबाबत परिपत्रक दि.28.05.2025
- Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..