राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वाढीव कामाचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अशा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाची तरतुद नमुद आहे .परंतु सदर निर्णयाची प्रभावी पणे अंमलबजावणी होत नाही .यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अतिरिक्त वेतन देणेबाबत , राज्य शासनांकडून GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्या शासन सेवेत कार्यरत काही कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वेतन लागु करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्यातील नेमके कोणत्या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने वेतन ( मानधन ) लागु करण्यात आलेले आहेत , याबाबत सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र शासनांच्या परिवहन सेवा कार्यालयाच्या वाहतुक शाखेमधील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने मानधन अदा करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यानुसार शासकीय परिवहन सेवा काार्यालयाच्या वाहतुक शाखेतील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने 10 दिवसांच्या कमाल मर्यादेच्या अधिन राहून मानधन देण्यास मंजुरी देण्यात येत आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन 2023 करिता सुधारित सार्वजनिक सुट्टी यादी प्रसिद्ध !
नियमित कार्यालयीन वेळेकरीता मानधन मिळणार नाही , परंतु नियमित कार्यालयीन वेळेनंतर केलेल्य अतिरिक्त पूर्णवेळ सेवेकरीता दुसरी शिफ्ट करीता एक दिवसाचे मूळ वेतन अदा करण्यात येईल .तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी अथवा Weekly Off च्या दिवशी केलेल्या कामाकरीता ( पहिली शिफ्ट ) करीता एक दिवसांचे मूळ वेतन अदा करण्यात येणार आहे .
सदर शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ मानधन म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांचे एका दिवसांचे मुळ वेतनाइतकी रक्कम असणार आहे .सदरचा शासन निर्णयातील सुधारित वेतन हे शासन निर्णय पारीत होण्याच्या दिनांकापासून लागू असणार आहेत .तसेच सदरचा शासन निर्णय हा शासकीय परिवहन सेवेतील वाहतुक विभागात कार्यरत नोंदणी लिपिक व नोंदणी पर्यवेक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहेत .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दि.25.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
शासकीय कर्मचारी तसेच शासकीय पदभरती / योजनांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .