राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत . सदचे विकल्प सादर करणेबाबत अनेक कर्मचाऱ्यांच्या मनांमध्ये संभ्रम निर्माण होत होते , याकरीता सदर लेखांमध्ये कोणत्या  कर्मचाऱ्यांने कोणाला विकल्प सादर करावा याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आलेली आहे .

यांमध्ये खाजगी / अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विकल्प नमुना भरुन आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विकल्प भरून द्यावे . त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपला विकल्प नमुना पंचायत समिती कार्यालयाला भरुन सादर करावा .

तर इतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या आस्थापना कार्यालयात (जिथे सेवा पुस्तक असेल तिथे) अशा ठिकाणी विकल्प नमुना भरुन जमा करावेत .विकल्प नमुना लवकरात लवकर भरुन आपल्याला वरीलप्रमाणे नमुद केलेल्या ठिकाणी सादर करावे लागणार आहे . अन्यथा वित्त विभागाच्या दि.31.03.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही .

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती / योजना यांच्या अपडेट करीता Whatsapp ग्रुप जाईन करा .

Click To Join Whatsapp Group

Leave a Comment