शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Land Purchase Loan Scheme ( BOI ) ] : शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया मार्फत कर्ज देण्यात येते . या बँकेकडून देण्यात येणाऱ्या कर्जाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे परतफेड करण्यासाठी जास्त कालावधी देण्यात येतो . या बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जमीन खरेदी कर्ज – योजनेचे खास उद्देश ( Land Purchase Loan Scheme ) : जमीन खरेदी कर्जाचे खास उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना कृषी तसेच पडीक आणि पडीक जमिनी खरेदी , तसेच विकास आणि लागवडीसाठी वित्तपुरवठा करणे आहे . तसेच इतर संलग्न क्रिया कलापांमध्ये स्थापना / विविधीकरणे करणे हे उद्देश आहेत .

कर्जाची रक्कम ही खरेदी करावयाच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्याचे मुल्यांकन आणि विकास खर्च यावर आधारित असणार आहेत . याकरीता क्षेत्राच्या निबंधक / उपनिबंधकांकडे मागील 05 वर्षांचे उपलब्ध  सरासरी नोंदणी मूल्य आणि बँकेने घेतलेले दृष्टिकोन विचार घेतले जातील .

जमीन खरेदी कर्ज घेण्यासाठी पात्रता : या करीता लहान आणि अत्यल्प शेतकरी यांमध्ये जास्तीत जास्त 05 एकर बिगरसिंचन जमीन अथवा 2.5 एकर बागायती जमीन असणारे शेतकरी या योजना अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेवू शकतील . यांमध्ये भाडेकरु शेतकरी तसेच महिला / बचत गट सदस्य यांना देखिल जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते .परंतु जमीनीची खरेदी ही गावाच्या हद्दीत अथवा 3 ते 5 किलो मिटर परिघात होणे गरजेचे आहे .

कर्ज घेण्याकरीता आवश्यक कागतपत्रे : याकरीता केवायसी कागदपत्रे ( यांमध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा ) , उत्पनाशी संबंधित कागतपत्रे , वैधानिक परवानग्या , प्रकल्प प्रस्तावाचा संपुर्ण तपशिल , जमिनीशी संबंधित कागतपत्रे खरेदी करण्याचा प्रस्तावसह ..

या योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठी 7669021290 या नंबरवर LANDP असे लिहून SMS करावेत , आणि 8010968370 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावेत .. अथवा आपल्या जवळच्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेला भेट द्यावेत .. तर अधिक माहितीसाठी https://bankofindia.co.in या संकेस्थळाला भेट द्यावीत ..

Leave a Comment