थकित वेतन अदा करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.29.03.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding payment of arrears of salary; GR dated 29.03.2025 ] : पात्र विशष शिक्षकांचे थकित असणारे मानधन ( वेतन ) अदा करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 29 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत 358 पात्र असणाऱ्या विशेष शिक्षकांपैकी ज्या विशेष शिक्षकांना मा.उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पदस्थापना देण्यात आलेली नाही .

परंतु असे जे विशेष शिक्षक शाळेवर कार्यरत असून मानधनासाठी पात्र आहेत , त्या विशेष शिक्षकांचे सन 2023-24 व सन 2024-25 या वर्षातील मानधन अदा करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण संचालक ( प्राथमिक ) पुणे यांनी दिनांक 04.02.2025 रोजीच्या पत्रानुसार शासनास सादर केला आहे .

अपंग समावेशित शिक्षण योजना ( माध्यमिक स्तर ) अंतर्गत 358 पात्र असणाऱ्या विशेष शिक्षकांपैकी ज्या विशेष शिक्षकांना मा.उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे पदस्थापना देण्यात आलेली नाही , परंतु जे विशेष शिक्षक शाळेवर कार्यरत असून मानधनासाठी पात्र आहेत , अशा 09 विशेष शिक्षकांना माहे एप्रिल 2023 ते मार्च 2025 या कालावधीमधील मानधन अदा करण्याकरीता रुपये 54,00,000/- इतके अनुदान वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

हे पण वाचा : माहे एप्रिल महिन्यात सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 56 टक्के दराने डी.ए वाढ मिळणार ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

सदर मानधन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहील्यास त्याबाबतचा अहवाल हा सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून , शिल्लक निधीचा विनियोग करण्यापुर्वी शासनांची पुर्वमान्यता घेण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच वितरीत करण्यात आलेल्या निधीचा उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनांस सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment