शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व्याज प्रदान करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.26.03.2025

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding provision of interest to teachers/non-teaching employees; GR dated 26.03.2025 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या GPF वरील व्याज प्रदान करणेबाबत , कौशल्य , रोजगार व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 26 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज प्रदानासाठी सन 2024-25 या कालावधी करीता रुपये 62,57.55 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पीत केलेला असून , ..

सदर निधी महालेखापाल , मुंबई / नागपुर , महाराष्ट्र यांच्याकडे पुस्तकी समायोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे . यानुसार प्रादेशिक कार्यालयाचे नाव व विभाग निहाय निधीची तरतुद पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रप्रा.कार्यालयोच नावनिधी ( रुपये लाखात )
01.मुंबई9,64.20/-
02.पुणे14,99.03/-
03.नाशिक10,16.10/-
04.औरंगाबाद09,60.66/-
05.अमरावती07,90.24/-
06.नागपुर10,27.32/-

वरील तक्ता नुसार , सर्व जिल्हा कोषागार अधिकारी तसेच सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांनी उपरोक्त व्याजाच्या रकमेचे समायोजन करुन अभिलेखांकित करण्याची व नोंद घेण्याची कार्यवाही करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : कनिष्ठ लिपिक , सहाय्यक इ. पदांच्या 321 रिक्त जागेसाठी महाभरती !

यानुसार राज्यातील अशासकीय अनुदानित व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सन 2024-25 या आर्थिक वर्षातील GPF निधीवरील व्याज प्रदान करीता रुपये 62,57.55 लाख इतकी रक्कम खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment