Employee GR : वैद्यकीय चाचण्या करुन घेण्यास अंतिम मुदतवाढ ; GR निर्गमित दि.26.03.2025

Spread the love

@marathipeper वंदना पवार प्रतिनिधी [ Employee GR: Extension of time to undergo medical tests; GR issued on 26.03.2025 ] : वैद्यकीय चाचणी करुन घेण्याकरीता अंतिम मुदवाढ देणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 26 मार्च 2026 रोजी अंत्यत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आखिल भारतीय सेवा ( कार्यमुल्यांकन अहवाल ) नियम 2007  नुसार भा.प्रशासकीय सेवेतील 40 वर्षे वयावरील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाच्या सारांश त्यांच्या कार्यमुल्यांकन अहवालासोबत जोडणे आवश्यक आहे .

याकरीता सन 2024-25 , 2025-26 व 2026-27 च्या कार्यमुल्यांकन अहवालाकरीता वैद्यकीय तपासणीबाबत शासन निर्णय समक्रमांक दिनांक 17 जानेवारी 2025 नुसार सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत . तसेच कार्यमुल्यांकन अहवालाचे वर्ष दिनांक 31 मार्च रोजी संपत असल्याने वैद्यकीय चाचणीही 31 मार्च पर्यंत करुन घेणे अपेक्षित आहे .

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांच्या जानेवारी 2025 DA वाढी बाबत अपडेट..

तथापि विधानमंडळ अधिवेशनाचे कामकाज , प्रशिक्षण इ. कारणास्तव दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत वैद्यकीय तपासणी करुन घेणे शक्य होत नसल्याने याकरीता मुदतवाढ देण्याबाबत , काही भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात येत आहे .

या बाबीचा विचार करुन अ.भारतीय सेवा ( कार्यमुल्यांकन अहवाल ) नियम 2007  नुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी कार्यमुल्यांकन वर्ष 2024-25 करिता वैद्यकीय चाचण्या करुन घेण्याकरीता दिनांक 15 एप्रिल 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे .

तसेच शासन निर्णय दिनांक 17 जानेवारी 2025 मधील अन्य सर्व तरतुदी कायम राहतील असे नमुद करण्यात आले आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment