UPS योजना बाबत सरकारी कर्मचाऱ्यांची या मुद्द्यांवर चिंता ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees are concerned about these issues regarding the UPS scheme ] : सरकारने जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना म्हणून युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली असली तरी , या पेन्शन योजनांमधील गुपित रहस्य अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना समजले नाहीत .

सदर पेन्शन योजनानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या ( शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मुळ वेतन ) 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल , असे नमुद असले तरी जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नसुन अनेक अटी / शर्ती टाकण्यात आले आहेत .

सध्याच्या युपीएस ( एकीकृत पेन्शन योजना ) मध्ये नवीन बदल झाला आहे , त्यानुसार जमा कॉर्पस च्या 60 टक्के रक्कम काढता येईल , परंतु ती रक्कम काढली तर पेन्शनची टक्केवारी कमी होईल असे नमुद करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : लेखापाल , निरीक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / चौकीदार पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका .

तसेच ज्यांना 50 टक्के पेन्शन हवी आहे त्यांना ही जमा रक्कम काढता येणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत , तसेच जर सेवा 33 वर्षे असेल तर 50 टक्के पेन्शन करीता 33 वर्षे अखंड नियमित कपात आवश्यक असणार आहे .

जर 33 पैकी 25 वर्षे कर्मचारी योगदानाची रक्कम कपात असेल तर 50 टक्के पेन्शन मिळणार नसल्याचे नमुद आहे , कारण 33 वर्षाच्या कपातीचा बेंचमार्क गाठता येत नाही , परिणामी पेन्शनची टक्केवारी घटेल .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment