@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government’s clarification on increasing retirement age of employees; Know the detailed news ] : कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवृत्तीचे वय वाढीबाबत मागणी करत आहेत , यावर सरकारकडून नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी तर काहींचे मत असे कि , कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय कमी करण्यात यावेत , जेणेकरुन तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील . यामध्ये आता सरकारकडून आपले मत स्पष्ट करण्यात आले आहेत .
मागील महिन्यात केंद्र सरकारकडून निवृत्तीचे वय तसेच भत्ते व सेवाशर्ती विषयक नियमावली लागु करण्याचे काम सुरु होते , यांमध्ये निवृत्तीच्या वयात बदल करण्याची मागणी बऱ्याच कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेली होती , यावर सरकारने आपली स्पष्ट भूमिका मांडल्याने निवृत्तीच्या वयाबाबत स्पष्टता दिसून आली आहे .
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत लेखी उत्तर देवून सांगितले कि , जे कर्मचारी हे स्वेच्छा (निवृत्तीच्या दिनांकापुर्वीच ) निवृत्ती देणार असेल तर अशांसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली असून , सदर नियमांचे पालन करणाऱ्यांनाच सदर निवृत्तीचा पर्याय उपलब्ध असेल .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारणे बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
तर तुर्तास सेवानिवृत्तीचे वय वाढविणे व कमी करणे बाबत सरकारचा सध्या तरी कोणतेही धोरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत . याबाबत राज्यसभेत विचाराण्यात आलेले प्रश्न व उत्तर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
राज्य सभेचे खासदार तेजवीर सिंह यांनी निवृत्तीच्या वय संदर्भात 02 महत्वपुर्ण प्रश्न उपस्थित केले होते . यांमध्ये पहिला प्रश्न असा कि, सरकार हे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत नविन योजना आणणार आहे , का ? या प्रश्नाला सरकारकडून स्पष्ट नकार दिला असून , याबाबत अद्याप कोणतीही नविन योजना नसल्याचे स्पष्ट करण्यात आले .
तर दुसरा प्रश्न असा कि , उशिरा निवृत्ती घ्यायची असेल त्या कर्मचाऱ्यांकरीता सरकारची काही योजना आहे का ? सदर प्रश्नाला देखिल स्पष्ट करताना सरकारकडून सांगण्यात आले कि , याबाबत नविन नियम आणले जाणार नाहीत .
स्वेच्छा निवृत्ती कोणत्या कारणांसाठी घेता येते : स्वेच्छा ( विहीत मुदतीच्या पुर्वी ) निवृत्ती घेण्याकरीता कर्मचाऱ्यांकडे काही प्रमुख कारण असणे आवश्यक असेल , जसे कि आरोग्याचे कारण , नविन व्यवसाय सुरु करणे , कुटुंबाला वेळ देणे , तसेच प्रवास व छंद जोपासणे या कारणांसाठी स्वेच्छा निवृत्ती घेता येते .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025