@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.07.2025 regarding payment of arrears of salary ] : थकित वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.उच्च न्यायालय ,मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिकानुसार विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासुन ते निवृत्ती पर्यंत ..
यांमध्ये माहे नोव्हेंबर 2023 पासुन केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणेकामी रुपये 5,28,14,307/- ( अक्षरी – पाच कोटी अठ्ठावीस लाख चौदा हजार तिनशे सात रुपये फक्त ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
तसेच थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिणना शिक्षण संचालक , महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणांस मान्यता देण्यात येत आहे . तसेच थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत तब्बल 3717 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
शिल्लक वेतन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहील्यास , त्याबाबतचा अहवाल हा शासनांस सादर करणे आवश्यक असणार आहे . तसेच निधीचे वितरण करीत असताना , वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले निर्णयांचे पालन करणे आवश्यक असेल .


- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025