@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 26.12.2025 regarding payment of special salary ] : विशेष वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 26.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्ते विशेष शिक्षकांचे वेतन अदा करणेकरीता रुपये 04,01,64,806/- इतका निधी त्याचबरोबर अपंग समावेशित शिक्षण ( माध्यमिक स्तर ) योजना अंतर्गत शासन स्तरावरील चौकशी समितीच्या अहवालानुसार पात्र ठरलेल्या…
161 पैकी 05 विशेष शिक्षकांच्या थकित वेतनाच्या रकमेतील तफावतीनुसार अदा करावयाची फरकाची रक्कम रुपये 20,13,188/- इतका निधी असा एकुण रुपये 22,42,59,729/- इतका निधी हा शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना उपलब्ध करवून देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
तसेच विशेष शिक्षकांना अदा करावयाच्या वेतनाची रक्कम मा.उच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार जमा करणेबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच विशेष शिक्षकांच्या वेतनाकरीता आवश्यक असणाऱ्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुर्ण यांना तपासणीच्या अधिन राहून निधी वितरणांस मान्यता देण्यात येत आहे .
तसेच याबाबत अनियमितता अथवा दिरंगाई होणार नसल्याचे सुचति करण्यात आले आहेत . व वेतन / मानधन अदा केल्याच्या नंतर निधी शिल्लक राहील्यास त्याबाबतचा अहवाल शासनांस सादर करुन , शिल्लक निधीचा विनियोग करण्यापुर्वी शासनाची पुर्वमान्यता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026
- वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील निवडश्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत GR निर्गमित दि.10.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांची डी.ए वाढीची प्रतिक्षा संपली ; केंद्राप्रमाणे 58% दराचे डी.ए वाढीचा अधिकृत्त GR याच महिन्यात !
- ऑनलाईन बदली बाबत परिपत्रक निर्गमित दि.05.02.2026