@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding amendment in the terms and conditions of the selection category in the Pay Deficit Redressal Committee Report ] : वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील निवडश्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत दिनांक 10.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वेतनत्रुटी निवारण समिती 2024 यांच्या अहवालातील राज्य शासनाने स्वीकृत केलेल्या शिफारशीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2019 प्रमाणे सुधारित वेतन असणाऱ्या राज्य शासनांच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या तसेच एकाकी पद ..
संवर्गांसह चार पेक्षा कमी पदसंख्या असलेल्या संवर्गांच्या बाबतीत मंजुर पदसंख्येच्या 25 टक्के प्रमाणाची अट याद्वारे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गांना तसेच एकाकी पद संवर्गासह चार पेक्षा कमी पदसंख्येच्या संवर्गातील एका पदाला निवडश्रेणी वेतनस्तर अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच शासन निर्णय वित्त विभाग दि.02.06.2025 यांच्या जोडपत्र क्र.02 मधील अ.क्र 29 यांमध्ये निर्दिष्ट केलेला विशिष्ट निवडश्रेणी वेतनस्तर संबंधित संवर्गांच्या बाबतीत लागु राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम 2019 नुसार वेतन मॅट्रिक्स मधील वेतनस्तर एस – 27 रुपये 118500-214100/- असणाऱ्या राज्य शासनांच्या सेवेतील गट अ मधील पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेले तसेच एकाकी पद संवर्गासह चार पेक्षा कमी पदसंख्येचे संवर्ग सर्व संवर्गांना याद्वारे एस – 28 रुपये 124800-212400/- ..
हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यात येत आहे . तसेच एकाकी पद संवर्गाच्या तसेच पदोन्नतीचे पद उपलब्ध नसलेल्या संवर्गाच्या बाबतीत , निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्यासाठी पात्रता तपासताना , शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि.01.08.2019 याद्वारे निश्चित करण्यात आलेली कार्यपद्धती व पात्रतेच्या अटी लागु राहतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .


- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026
- वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील निवडश्रेणीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करणेबाबत GR निर्गमित दि.10.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांची डी.ए वाढीची प्रतिक्षा संपली ; केंद्राप्रमाणे 58% दराचे डी.ए वाढीचा अधिकृत्त GR याच महिन्यात !
- ऑनलाईन बदली बाबत परिपत्रक निर्गमित दि.05.02.2026