Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ gratuity Calculation & eligibility ] : राज्यातील जुनी पेन्शन धारकांना सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदान मिळते , तर राज्य शासनांने नुकेतचे जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सर्वच अधिकरी / कर्मचारी सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम प्राप्त होणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर जी एकरकमी उपदानाची रक्कम अदा करण्यात येते , त्यास सेवानिवृत्ती उपदान असे संबोधले जाते . सेवानिवृत्ती उपदान ( gratuity ) हा देखिल निवृत्ती वेतन ( Pension ) चा भाग ग्राह्य धरला जातो . ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची किमान सेवा 5 वर्षे पुर्ण झाली असेल अशांना सदर उपदानाची रक्कम मिळते .
कर्मचाऱ्यांच्या त्याच्या अहर्ताकारी सेवाच्या प्रत्येक 6 माही कालावधीसाठी वेतनाच्या ¼ रक्कम ही gratuity म्हणून अदा केली जाते , परंतु सदर gratuity रक्कमेची मर्यादा ही अंतिम वेतनाच्या 16 ½ महिन्यांच्या वेतन अशी ठरविण्यात आली आहे . तर दिनांक 16.01.2016 रोजीच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांस gratuity ( सेवानिवृत्ती उपदान ) ची कमाल रक्कम 14 लाख पर्यंत दिली जाईल .
सेवानिवृत्ती उपदान (gratuity ) रक्कम काढण्याकरीता सुत्र : कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन X ( सेवाकाळ X 2 ) / 4
उदा . एक्स कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन हे 50,000/- आहे , व त्याची सेवा 20 वर्षे झाली असल्यास त्यास मिळणारे उपदान रक्कम = 50,000 X ( 20 X 2 ) / 4 = 500,000/- म्हणजेच सदर कर्मचाऱ्यांस सेवानिवृत्तीनंतर 5 लाख रुपये इतकी रक्कम सेवानिवृत्ती उपदान म्हणून मिळेल .
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.