वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding medical expense reimbursement issued on 27.02.2026 ] : वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.27.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक  निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तांत्रिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरुन शासनांस सादर केले जाणार आहेत .

तसेच शासन स्तरावरुन प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर असे निर्देशास येत आहेत कि , उपसंचालक स्तरावरुन प्रस्तावाची तपासणी न करता अपुर्ण प्रस्ताव / तपासणी सुचीनुसार कागदपत्रे नसलेली प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात येत आहेत .

तसेच शासन स्तरावर प्रस्ताव सादर झाल्याच्या नंतर प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्यामुळे प्रस्तावांना विलंब होत आहे असे नमुद करण्यात आले आहेत .तसेच शासन स्तरावर प्राप्त समितीचे इतिवृत्त , वैयक्तिक मान्यता शासन आदेश 100 टक्के अनुदानित पदाचे वेतन घेत असल्याचे भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाचे प्रमाणपत्र शिक्यांसहित , शाळा मान्यतेचे शासन आदेश शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी ..

असल्यास शाळा 100 टक्के अनुदानित असल्याबाबतचे शासन आदेश व रुग्णालयीन कालावधीतील शाळेची संच मान्यता इ.कागदपत्रे उपलब्ध करण्यात यावेत . असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर कागदपत्रे प्रमाणित करुन व शिक्यांसहित शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment