Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding payment of salary for April and May 2026 of State Officers/Employees issued on 27.03.2026 ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल देय मे 2026 वेतन अदा करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.27.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आला आहे कि , सेवार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे माहे एप्रिल 2026 देय मे 2026 या वेतन देयक अदा करण्यापुर्वी ई – केवायसी पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर ई – केवायसी पुर्ण न केल्यास , सबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2026 देय माहे मे 2026 चे वेतन आहरित करण्यात येणान नसल्याचे स्पष्ट नमुद करण्यात आले आहेत . सदर ई – केवायसी पुर्ण करण्यापुर्वी अधिकारी / कर्मचारी यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न असलेले बँक खाते सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे आवश्यक असणार आहे .
सेवार्थ प्रणालीत उपलब्ध असणारे बँक खाते आधार क्रमांकांशी संलग्न नसेल तर असे खाते त्वरीत बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सेवार्थ प्रणालीत आधार क्रमांकांशी संलग्न असलेले बँक खाते अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सेवार्थ प्रणालीत नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांक चुकीचा असल्यास , नोंदविण्यात आलेला पॅन क्रमांकाची दुरुस्ती करुन अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच सदर ई – केवायसी प्रत्येक अधिकारी / कर्मचाऱ्यांनी व्यक्तिश : पुर्ण करुन त्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदरचा निर्णय राज्यातील राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागु असणार आहे .

- दि.30 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत राज्यातील या भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता ..
- सार्वत्रिक बदल्या 2026 च्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.27.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल देय मे 2026 वेतन अदा करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.03.2026
- SBI मध्ये खाते असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास SBI एक्सप्रेस क्रेडिट (Xpress Credit) योजना .
- मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.24.03.2026