मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसुचना क्र.39/1/68 जेयुडीएल दि.08.05.1968 रोजीच्या अधिकाराचा वापर करुन सन 2023 या वर्षाकरीता सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदरच्या सुट्ट्यांच्या यादीचा उपयोग राज्यातील विद्यार्थी , नागरिक , शासकीय कर्मचारी यांना होणार आहे .
यांमध्ये माहे जानेवारी 2023 मध्ये 26 जोनवारी – प्रजासत्ताक दिन , त्यानंतर माहे फेब्रुवारी 2023 मध्ये 18 फेब्रुवारी महाशिवरात्री , 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती , त्यानंतर 7 मार्च – होळी , 22 मार्च गढीपाडवा , 04 एप्रिल महावीर जयंती , गुड फ्रायडे 07 एप्रिल नंतर 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती या दिनादिवशी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आलेले आहेत .
त्यानंतर महाराष्ट्र दिन 01 मे , बद्ध पौर्णिमा 05 मे , बकरी ईद 28 जुन , मोहरम 29 जुलै , स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट , पारशी नववर्ष 16 ऑगस्ट , गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर ,ईद ए मिलाद 28 सप्टेंबर , महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोंबर ,दसरा 24 ऑक्टोंबर , दिवाळी अमावस्या 12 नोव्हेंबर , दिवाळी ( बलिप्रतिपदा ) 14 नोव्हेंबर ,गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर , ख्रिसमस 25 डिसेंबर अशा एकुण 24 सार्वजनिक सुट्ट्या मंजुर करण्यात आलेल्या आहेत .
राज्य शासनाच्या अधिनस्त सार्वनजिक बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता यावे , याकरीता दि. 01 एप्रिल रोजी दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असते .या संदर्भातील राज्य शासनांकडुन सार्वजनिक सुट्टी बाबत प्राधिकृत रित्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .