Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चक्क 46 टक्के पर्यंत वाढ ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपेडट आकडेवारीसह !

Spread the love

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये चक्क 46 टक्के पर्यंत वाढ होणार आहे .यामुळे सरकारी कर्मचारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पगार / पेन्शन मध्ये निश्चितच मोठी वाढ होणार आहे .याबाबत आत्ताची मोठी अपडेट आकडेवारीसह पुढीलप्रमाणे पाहुयात .

केंद्र सरकारच्या अधिनस्त कार्यरत कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 पासून 42 टक्के प्रमाणे डी.ए वाढीबाबतचा निर्णय केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये घेतला व प्रत्यक्ष डी.ए वाढ फरकासह लागु करण्यात आले .कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये दरवर्षी दोनदा वाढ होत असल्याने , माहे जुलै 2023 मधील डी.ए वाढ साठी नुकतेच आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे .या आकडेवारींच्या आधारे महागाई भत्तामध्ये वाढ निश्चित करण्यात येणार आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचारी पुन्हा जाणार बेमुदत संपावर !

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ( AICPI ) आकडेवारी जाहीर –

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहे , या आकडेवारींच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे डी.ए दर ठरत असते . सदरचे निर्देशांकाच्या आकडेवारी नुसार माहे जानेवारी 2023 मध्ये AICPI चा आकडा वाढून 132.8 अंकावर पोहोचला आहे त्यानंतर माहे फेब्रंवारी मध्ये या आकडेवारीमध्ये घसरण होवून 132.7 अंकावर आकडेवारी पाहोचली तर , यानंतर माहे मार्च महिन्यांत यांमध्ये मोठी वाढ होवून सदरची आकडेवारी 133.3 अंकावर जावून पोहोचली आहे .

महागाई भत्तामध्ये 46 टक्के पर्यंत होणार वाढ !

वरील निर्देशांकाचा विचार केला असता , वरील माहे मार्च पर्यंतची आकडेवरींचा विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मधील डी.ए मध्ये 44 टक्के वाढ अपेक्षित आहे . तर माहे एप्रिल ते जुन या कालावधीमध्ये भविष्यात AICPI ची वाढ भाकित केले असता , निश्चितच सरकारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 46 टक्के पर्यंत वाढ होणार आहे .

शासकीय कर्मचारी विषयक (Employee Related ) अपडेट करीता Whatsapp ग्रुपमध्ये अवश्य सामील व्हा

Join Whatsapp Group

Leave a Comment