Mortgage Loan : अशाप्रकारे प्रॉपर्टीवर कमी व्याज दारात काढा कर्ज! प्रॉपर्टी वरील कर्ज सुविधा पहा !

Spread the love

Mortgage Loan : मालमत्तेवर आपण जे कर्ज घेतो ते कर्ज एक सुरक्षित असे कर्ज असून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी कर्जदार व्यक्तीकडे त्या व्यक्तीची मालमत्ता गहाण ठेवली जाते आणि कर्ज उपलब्ध केले जाते. कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी आपण घर जमीन इतर कोणतीही मालमत्ता किंवा व्यावसायिक वैयक्तिक प्लॉट इत्यादी गोष्टी गहाण ठेवू शकतो.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? मालमत्तेवर आपण कर्ज घेतो त्या कर्जाची रक्कम ही इतर जे कर्ज असतात त्या कर्जाच्या तुलनेमध्ये जास्तीची रक्कम असते. यासोबतच मालमत्तेवरील जे कर्ज घेतो आपण ते कर्ज फेडण्याची मुदत सुद्धा वाढवलेली असते. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कर्ज कशाप्रकारे मिळवायचे याची प्रक्रिया आता आपण बघूया.

Loan against property calculator

आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या प्रॉपर्टी वरती संस्थेच्या माध्यमातून किंवा बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज सादर करतो. त्यावेळी त्या बँकेच्या माध्यमातून रिपोर्ट मागविण्यात येतो. बँकेच्या नियमावलीमध्ये बऱ्याचदा आपल्याला असे दिसेल की शेतजमिनीच्या प्लॉट वरती कर्ज देण्यास बँक प्राधान्य देते.

तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू नक्की किती आहे? यासोबतच यापूर्वी या मालमत्तेवर नक्की कोणाचा अधिकार होता? न्यायालयामध्ये या प्रॉपर्टी बाबत कोणती प्रकरणे चालू आहेत का? याची पडताळणी बँक करतील.

बँकेकडून जो वकील नेमण्यात आलेला आहे त्या वकिलाच्या माध्यमातून बँक सर्च रिपोर्ट मागवते यामध्ये प्रॉपर्टीच्या सर्च रिपोर्ट खूप आवश्यक आहे. कोणतीही बँक कर्ज उपलब्ध करून देणे अगोदर सर्च रिपोर्ट मागत असते. शिवाय बँकेने मागवलेल्या कागदपत्रांची पूर्तता सुद्धा तुम्हाला करावी लागते केवायसी प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी बघितली जाते…

कर्ज उपलब्ध करून घेत असताना तुम्हाला हा प्रश्न पडला असेलच की मालमत्तेवरून कर्ज काढणे खरेच योग्य आहे का? तर मित्रांनो तुम्हाला खरोखर कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही मालमत्तेवर कर्ज काढले तर इतर कर्जाच्या तुलनेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगली सुविधा मिळतील. कारण की कमी व्याज दरामध्ये आपल्याला कर्ज उपलब्ध करून दिले जाते यासोबत जास्त कालावधी मिळतात परतफेडीचा कालावधी निश्चित केला जातो.

यामध्ये आता तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की, मालमत्तेवर आपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर बाकीचा इतर इन्कम सोर्स आपल्याकडे असावा का? तर तसे काही नाही तुमच्याकडे जरी इन्कम सोर्स नसेल तरी तुम्ही तुमच्या प्लॉटवर किंवा जमिनीवर कर्ज घेऊ शकतात.

Leave a Comment