@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important news for those who have accounts in private banks like ICICI and HDFC ] : ICICI व HDFC ह्या बँका खाजगी क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक बँका आहेत . भारताच्या अर्थव्यवस्थेत ह्या दोन बँकाचा मोठा वाटा आहे .
ICICI व HDFC या दोन्ही बँकांनी आपल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा चार्जमध्ये वाढ केली आहे . सदरची वाढ ही दिनांक 01 जुलै पासुन लागु केली जाणार आहे . दिनांक 01 जुलै पासुन काही सुविधांना अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार आहे .
बँकेमार्फत विविध सुविधा दिल्या जातात , जसे कि एटीएम , वॉलेट , क्रेडिट कार्ड अशा सुविधा दिल्या जाता , आता सदर सुविधांच्या चार्जेस मध्ये वाढ लागु करण्यात येणार असल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण येणार आहे .
थर्ड पार्टी वॉलेट व्यवहार , क्रेडीट कार्ड वापर तसेच IRCTC व्यवहार व ATM शुल्क संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत . यांमध्ये थर्ड पार्टी वॉलेटच्या माध्यमातुन 10,000/- रुपये पेक्षा अधिक रुपयांचा व्यवहार केल्यास आपणांस 01 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये 6180 रिक्त जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती ;
याशिवाय 15,000/- रुपये पेक्षा अधिक रुपयांचे इंधन व्यवहारावर 01 टक्के अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे . तसेच 50,000/- रुपये पेक्षा जास्त Utility bill पेमेंट वर 01 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे .
ATM : एटीएमची व्यवहार ( Transaction ) लिमिट संपल्यानंतर अतिरिक्त चार्ज द्यावे लागणार आहेत . यांमध्ये ATM चे 03 व्यवहारचे लिमिट संपल्यानंतर 23/- रुपये प्रति व्यवहारासाठी चार्ज लागणार आहे . यापुर्वी हे दर 21/- रुपये इतके होते .
- ICICI व HDFC या खाजगी बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वपुर्ण बातमी ; दिनांक 01 जुलैपासुन नवे नियम लागु !
- लाडकी बहीणींसाठी अल्प व्याजदरात कर्ज ( Loan ) उपलब्ध ; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा !
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ; जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ !
- New Pay : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !
- पुढील 36 तासासाठी राज्यातील या 20 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज .