जुनी पेन्शन योजना ( OPS) लागू करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित दि.26.11.2024

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme shasan nirnay ] : जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , काल दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .या निर्णयानुसार , प्रलंबित बाबींवर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये सामान्य प्रशासन विभाग मार्फत , फ्ला ले . धनंजय यशोधन सदाफळ ( सेवानिवृत्त ) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , यांना जुनी पेन्शन योजना  तसेच त्या अनुषंगिक सर्व प्रकारचे लाभ ( GPF / निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण ) लागु करण्यास मंजूर देण्यात आलेली आहे . या संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार , उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील अधिव्याख्यात्यांना वित्त विभागांच्या दि.02.02.2024 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व GPF सुविधा लागु करण्यात येत आहेत .

सदरच्या निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागातील 20 अधिव्याख्यातांना जुनी पेन्शन योजना ( Old Pension ) योजना लागु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे , सदर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment