मराठी पेपर टीम , प्रणिता प्रतिनिधी : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठीत समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत संचालक लेखा व कोषागारे यांच्याकडून श्री.विश्वास काटकर सरचिटणीस तथा सरकारी – निमसरकारी , शिक्षक -शिक्षकेत्तर महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती , यांच्याप्रती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आलेली आहे . सदर समितीस दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस / अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .
याकरीता प्रस्तुत प्रश्नांची समुचित उकल करण्यासाठी कर्मचारी संघटना समवेत सखोल विचार विमर्ष करणे समितीस आवश्यक वाटते असल्योन समिती बरोबर चर्चा करण्यासाठी कर्मचारी संघटनांना निमंत्रित करण्यात येत आहेत . दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास कर्मचारी संघटनांकडून काही उपयायोजना सुचवू इच्छित असतील तर त्याकरीता सदर बैठक आयोजित करण्यात येत आहे .
या समितीबरोबर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक बाबी सादरीकरण करण्यासाठी दि.21.04.2023 वार शुक्रवार रोजी 12.00 ते 01.00 वाजता अ.मु.रा. वित्त विभाग यांचे 5 वा मजल्यावरील दालन इमारत मंत्रालय येथे अनुषंगिक प्रस्तावासह कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024