मराठी पेपर टीम , प्रणिता प्रतिनिधी : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठीत समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत संचालक लेखा व कोषागारे यांच्याकडून श्री.विश्वास काटकर सरचिटणीस तथा सरकारी – निमसरकारी , शिक्षक -शिक्षकेत्तर महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती , यांच्याप्रती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार समिती गठीत करण्यात आलेली आहे . सदर समितीस दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस / अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत .
याकरीता प्रस्तुत प्रश्नांची समुचित उकल करण्यासाठी कर्मचारी संघटना समवेत सखोल विचार विमर्ष करणे समितीस आवश्यक वाटते असल्योन समिती बरोबर चर्चा करण्यासाठी कर्मचारी संघटनांना निमंत्रित करण्यात येत आहेत . दि.01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यांनतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास कर्मचारी संघटनांकडून काही उपयायोजना सुचवू इच्छित असतील तर त्याकरीता सदर बैठक आयोजित करण्यात येत आहे .
या समितीबरोबर चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक बाबी सादरीकरण करण्यासाठी दि.21.04.2023 वार शुक्रवार रोजी 12.00 ते 01.00 वाजता अ.मु.रा. वित्त विभाग यांचे 5 वा मजल्यावरील दालन इमारत मंत्रालय येथे अनुषंगिक प्रस्तावासह कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे .

- Gold Price Today : खुशखबर ! सोने चांदीचे दर आता पुन्हा घसरले; दहा ग्राम सोन्याच्या नवीन दर पहा !
- आत्ताची मोठी बातमी , देशात पुन्हा एकदा नोटबंदी ! या तारखेपर्यंत नोटा बँकेत जमा करता येणार !
- Breaking News : आता राज्यातील नागरिकांना धान्या ऐवजी मिळणार पैसे , प्रतिव्यक्ती ऐवढे मिळणार पैसे !
- Property : पित्याने मुलांच्या नावावर संपत्ती केली असल्यास , मुलगी पित्याच्या संपत्तीवर न्यायालयात दावा करु शकते का ? कायदा काय सांगतो पाहा !
- Employee : सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा 50/55 वर्षे अथवा 30 वर्षे सेवानियम लागु होणार ,कडक कारवाईचे आदेश !