@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Sample of giving UPS/NPS/Modified NPS Pension Option to State Officers/Employees holding NPS (PDF) ] : राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 20.09.2024 रोजीच्या ( वित्त विभाग ) शासन निर्णयानुसार पेन्शन बाबत विकल्प देण्याचे नमुद आहे .
सदर विकल्प नमुना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयास सादर करायची शेवटची तारीख आहे . उक्त शासन निर्णयानुसार सुधारित पेन्शन योजना ही दिनांक 01 मार्च 2024 पासुन लागु करण्यात आलेली आहे . तर सदर सुधारित पेन्शन योजना करीता दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत विकल्प नमुना भरुन सादर करावयाचा आहे .
विकल्पामध्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना / केंद्र सरकारची एकीकृत निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु करावी याबाबत विकल्प द्यायचा आहे . यांमध्ये कर्मचाऱ्याचे सही / अंगठा , नाव व पदनाम नमुद करावयाचा आहे . तसेच स्थळ व विकल्प स्विकार करणाऱ्या प्रमुखाची सही व शिक्का नमुद असणार आहे .
हे पण वाचा : गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
सदर विकल्प भरल्यानंतर राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर पेन्शन योजनानुसार पेन्शन लाभ मिळणार आहे . जर सदर विकल्प नमुना भरलाच नाही तर आपणांस राष्ट्रीय पेन्शन योजनाच लागु राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
यामुळे खाली नमुद असणारा विकल्प नमुना हा दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना भरुन आपल्या कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचे आहे .विकल्प नमुना पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- NPS धारक राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना UPS / NPS / सुधारित NPS पेन्शन विकल्प देण्याचा नमुना ( PDF )
- आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाचा विकल्प निवडला असेल तर , निवृत्तीनंतर अशी मिळेल पेन्शन ; जाणुन घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळी अधिवेशनात निर्णय ; महागाई भत्ता , वेतनत्रुटी आक्षेप , निवृत्तीचे वय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” प्रणाली विकसित करणेबाबत शुद्धीपत्रक निर्गमित दि.25.06.2025
- राज्याच्या इतिहासात वीजदरात कपाती बाबत पहिल्यांच मोठा निर्णय ; महावितरणचे राज्याचे मुख्यमंत्र्यांकडून आभार !