महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी करत आहेत , या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखिल झालेली आहे . बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहेत .
निवृत्तीचे वय वाढविल्यास , राज्य सरकारचे 4 हजार कोटी वाचणार !
राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 हजार पदे भरण्याचा निर्धार केला असला तरी सामान्य प्रशासनाच्या धोरणानुसार एकुण पदसंख्येच्या केवळ 4 टक्के पदेच भरता येतात . यामुळे 75 हजार पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाला पुढील 4 वर्षे लागतील , यामुळे जर राज्य शासनांने निवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास राज्य शासनांचे दरवर्षी 4 हजार कोटी रुपये वाचतील असा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे .
दरवर्षी राज्य शासन सेवेतुन 50 ते 60 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात , यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना प्रतीवषी 60 लाख निधी द्यावा लागतो , यामुळे दरवर्षाला राज्य सरकारला 60 हजार कर्मचाऱ्यांचा विचार केला असता दरवर्षाला तीन हजार 600 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा येईल . यामुळे निवृत्तीचे वय वाढविल्यास हा 4 हजार कोटींचा बोजा वाचणार असल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे .