जुनी पेन्शन मागणीकरीता राज्यातील कर्मचारी दि.14 मार्च ते 20 मार्च पर्यंत संप केला होता , आता पुन्हा कर्मचारी महामोर्चा काढण्याार आहेत . याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत राज्य शासनास निवेदन देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर निवेदन पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन ) दुसरी सुधारणा नियम 2005 हा अन्यायकारक नियम रद्द करुन महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व सर्व साधारण भविष्य निर्वाह निधी योजनेचे सर्व लाभ महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्वरीत लागू करणे विषयी विनंती करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : या एफडीने बँकांना सुद्धा टाकले मागे ! एफडीवर मिळत आहे तुम्हाला आता 9.43% व्याज !
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 हा अन्यायकारक नियम रद्द करण्याची कार्यवाही दि.01 मे 2023 कामगार दिनापर्यंत न झाल्यास , महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील सर्व कर्मचारी संविधानाने दिलेल्या आपल्या न्याय हक्कासाठी दि.16.05.2023 पासून चैत्यभूमी ते मंत्रालयावर महामोर्चा काढणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन , दुसरी सुधारणा नियम 2005 हा अन्यायकारक नियम रद्द करण्याची कार्यवाही होईपर्यंत मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत निर्गमित झालेला सविस्तर निवेदन खालील प्रमाणे पाहु शकता ..