शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरती संदर्भातील अधिसूचना बाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.29.04.2024

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Teaching & Non Teaching Employee Recruitment Adhisudhana related Shasan Nirnay ] : मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन परिपत्रक , दिनांक 01 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती रद्द करुन त्या अनुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपद्धती बाबत सूचना निर्गमित करणेबाबत , राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे  .

राज्यातील खाजगी शाळांमधील शिक्षकांचे विना अनुदानित तसेच अशंत : अनुदानित वरुन अनुदानित किंवा अंशत : अनुदानित पदांवर बदली करण्याबाबत अधिसूचना दिनांक 08.06.2020 मधील नियमांनुसार तसेच शासन निर्णय दिनांक 01 एप्रिल 2021यास शासन परिपत्रक दिनांक 01 डिसेंबर 2022 नुसार दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे . त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना पुढीलप्रमाणे सूचित करण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , शा.परिपत्रक दिनांक 01 डिसेंबर 2022 च्या विरोधात दाखल रिट याचिका प्रकरणी मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्या संदर्भात शासन अधिसूचना , दिनांक 08 जुन 2020 व शासन निर्णय दिनांक 01 एप्रिल 2021 मधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरुन सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सेवानिवृत्ती उपदानाची ( gratuity ) किती रक्कम मिळते ? जाणून घ्या पात्रता व सुत्र !

त्याचबरोबर राज्यातील विना अनुदानित अथवा अशंत : अनुदानित वरुन अनुदानित / अंशत : अनुदानित पदावर बदली या संदर्भात उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यांमध्ये मा.न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत , आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत , असे सूच‍ित करण्याात आलेले आहेत .

 व सदर वरील नियमांनुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तर सदर नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशांपर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

या संदर्भात राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..

Leave a Comment