राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना बचत निधी लाभ प्रदानाचे जानेवारी ते डिसेंबर 2024 कालावधीतील परिगणितीय तक्ते , बाबत महत्वपुर्ण GR !

Spread the love

Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [ State Employee January To December Period GIS Pariganitiy Takte GR ] : राज्यातील शासकीय कर्मचारी यांना गट विमा योजना 1982 बचत निधीच्या लाभ द्यावयाच्या अनुषंगाने प्रदानाचे परिगणितीय तक्ते ( दि.01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 कालावधीकरीता ) बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 31.01.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

दिनांक 01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालाधीमध्ये राज्यातील शासकीय कर्मचारी गट विमा योजनांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास देय होणाऱ्या बचत निधीचे लाभाचे प्रदान करण्याकरीता परिगणित तक्ता सदर शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधी मध्ये राजीनाम , सेवानिवृत्ती अथवा सेत असतानांच मृत्यू पावल्यास त्यांचे गट विमा योजनेचे सभासदस्य सुपुष्टात येईल .

व त्यांना सदर गट विमा योजनांच्या लाभ कर्मचाऱ्यांना / वारसांना प्रदान करावयाच्या निधीची रक्कम देण्याकरीता परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेले आहेत , त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 च्या नियम 8.4 नुसार बचत निधीवरील शिल्लक असणाऱ्या रक्कमेवर दर.साल ( तिमाही चक्रवाढ होणारे ) दराने व्याज देणेच्या तरतुद आहे , त्यानुसार सदर योजना अंतर्गत बचत निधीमधील संचित रकमांवर दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 7.1 टक्के ( तिमाही चक्रवाढ होणारे ) व्याज आकारण्यात आले आहे .

सदर शासन निर्णयासोबत कर्मचाऱ्याचे मृत्यू , राजीनाम , सेवानिवृत्ती इ. कारणांमुळे वरील नमुद कालावधीमध्ये गट विमा योजनेचे सभासद रद्द झाल्यास रुपये 60/- याप्रमाणे अंशदान करणाऱ्या बचत खात्यांमध्ये संचित होणारी बचत निधीची व्याजाची देय होणारी रक्कम दर्शविणारा तक्ता व सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

Leave a Comment