निवृत्तीचे वय वाढ व जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबतचा विचार सरकारमार्फत प्रस्तावित ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The issue of old pension scheme and increase in retirement age is under consideration of the government. ] : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व निवृत्तीचे वय वाढ करणेबाबत , सरकार सकारात्मक विचार करीत आहे . याबाबतची आत्ताची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

जुनी पेन्शन योजना ( Old Pension ) : सध्या देशातील सर्वच सरकारी यंत्रणातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन साठी लढा सुरु आहे . नुकतेच केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शनला पर्याय पेन्शन प्रणाली म्हणून युपीएस ( युनिफाईड पेन्शन योजना ) ..

लागु केली आहे . परंतु पंरतु सदर पेन्शन प्रणालीमध्ये देखिल जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळत नाही . यामुळे जुनी पेन्शन योजनाच लागु करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे .

नुकतेच आलेल्या मिडीया रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर योग्य तो समाधानकारक आर्थिक लाभ मिळेल अशा प्रमाणात पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत . यामुळे केंद्र सरकारमार्फत पेन्शन प्रणालीमध्ये पुन्हा एकदा संशोधन करण्यात येत आहेत .

02.निवृत्तीचे वय : निवृत्तीचे वय वाढीवर केंद्र सरकार सकारात्मक असुन , प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे वरुन 62 वर्षे इतके करण्यात येणार आहे .

कारण केंद्र सरकारच्या सर्वच विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . शिवाय पदभरती प्रक्रिया ते नियुक्ती पर्यंत बराच अवधी लागत असल्याने , निवृत्तीचे वय वाढीस केंद्र सरकार सकारात्मक विचार करीत आहे . याबाबत लवकरच अधिकृत्त निर्णय घेतला जाईल .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment