अमेरिका  – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !

Spread the love

@marathipepar प्रतिनिधी [ US-China trade war will be a big benefit for Indian consumers; prices of electronic goods like refrigerators, TVs, mobiles will fall ] : सध्या अमेरिका – चीन व्यापार युद्ध सुरू आहे , अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्क विरोधात चीनने देखील अमेरिकेच्या वस्तुवर आयात शुल्क लादल्यामुळे व्यापार युद्ध अधिकच वाढले आहे . यामध्ये भारतीय ग्राहकाला इलेक्ट्रॉनिक वस्तू  (electronic products ) स्वस्तात मिळणार आहेत .

जगामध्ये व्यापारी युद्ध सुरू असताना भारताला स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा मिळणार ?  असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल . परंतु भारतात सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिका देशाकडून आयात केली जाते ,  तर दुसऱ्या क्रमांकावर चीन देशाकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करण्यात येते .

अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्कामुळे चिनी वस्तूंची अमेरिकेत मागणी कमी ,  तर किंमत वाढल्या आहेत . याशिवाय अमेरिकन इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सर्वात मोठा ग्राहक हा भारत आहे . तर चीनला आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतामध्ये विक्रीसाठी सवलत देण्यात येत आहे .

या सवलतीमुळे चिनी इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारतामध्ये तब्बल 5% सवलतीत विक्री करण्यास सुरुवात केली आहे . यामुळे मोबाईल , फ्रिज , टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतीय ग्राहकांना 5%  सवलतीसह मिळणार आहेत .

हे पण वाचा : निर्धन रुग्ण व गरीब रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपचार ; सरकारच्या धर्मदाय योजना बाबत जाणून घ्या सविस्तर !

अमेरिकन व्यापारी युद्धामुळे अमेरिकेतून भारतीय व्यापारी कंपन्या कमी वस्तू खरेदी करत आहेत . तर चीन देशांमधून सवलतीसह स्वस्थ दरात वस्तूंची आयात करत आहेत . ज्यामुळे भारतीय ग्राहकांना जागतिक व्यापार युद्धामध्ये देखील फायदा होणार आहे .

अमेरिकेने चीन देशातील वस्तूवर आयात शुल्क 104% वाढवला आहे . त्याला प्रतिउत्तर म्हणून चिनने अमेरिकन वस्तूवरील आयात कर 84% पर्यंत वाढवला आहे . अशा व्यापार युध्दात,  भारताने निष्पक्ष भूमिका घेतली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment