राज्य कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी निवारण संदर्भात वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.26.11.2024

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale samiti mudatvadh shasan nirnay ] : सातवा वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी असणाऱ्या पदांचे वेतनत्रुटी दुर करण्यासाठी गठीत समितीला आपला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 26.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

7 व्या वेतन आयोगातील वेतनांमधील त्रुटी संदर्भात विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशनुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता त्याचबरोबर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग मार्फत प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या 7 व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करुन शिफारणी करण्याकरीता राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.16.03.2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आलेली आहे .

सदरच्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार दि.31.10.2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे , तसेच सदर समितीस अहवाल सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .

सदर शासन निर्णयानुसार , सदर समितीस सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटींबाबत अहवाल तयार करुन वित्त विभागास सादर करण्यास दिनांक 30.11.2024 पर्यंत म्हणजेच पुढील 4 दिवस मुदत वाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .

दिनांक 30.11.2024 रोजी नंतर म्हणजेच दिनांक 01.12.2024 रोजी सदर वेतनत्रुटी अहवाल राज्य शासनांस सादर करण्यात येणार आहे . व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे .

Leave a Comment