राज्य कर्मचारी संदर्भात दि.05 जून रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्त्वपुर्ण GR !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 very important GRs were issued on 05th June regarding state employees! ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दिनांक 5 जून 2025 रोजी 03 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .

01. पदनाम मध्ये बदल GR : कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामांमध्ये अनुक्रमे  उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा बदल करण्यात आलेला असून,  या संदर्भात  कृषी विभागाकडून दिनांक 05 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे की , सदर पदनाम मध्ये बदल केल्याने , भविष्यात वेतनश्रेणी वाढ संदर्भात कोणत्याही प्रकारची मागणी विचारात घेतली जाणार नसून , पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी / वेतनस्तर वाढ करण्याच्या  अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे .

हे पण वाचा : वेतन त्रुटी निवारण नंतर सुधारित वेतनश्रेणीचा असा मिळेल लाभ ; जाणून घ्या सविस्तर .

सातवा वेतन आयोगानुसार कृषी पर्यवेक्षक पदास S 13 ( 35400-112400/- ) तर कृषी सहाय्यक या पदास S 8 ( 25500-81100) अशी वेतनश्रेणी आहे . सदर पदनाम मध्ये बदल केल्याने , वेतनस्तर वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची किंवा नव्याने वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी विचारात घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .

सदर पदनामांमध्ये बदल केल्याने , सदर पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये केवळ पदनाम बदल केले जाणार असून , इतर सेवा प्रवेश नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . किंवा सदर पदावरील कर्मचाऱ्यांना बजावण्यात येणाऱ्या सर्व कर्तव्य व जबाबदारी पार व पाडावे लागणार आहेत .

उर्वरित 02 शासन निर्णय पाहण्यासाठी Click Here

WhatsApp Group Join Now

Leave a Comment