कर्मचारी वेतन अनुदान व राज्यातील शाळेत सुधारित धोरण निश्चित करणे संदर्भात GR निर्गमित ; दि.05.06.2025

Spread the love

@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ GR issued regarding employee salary subsidy and determining revised policy in schools in the state; Dated 05.06.2025 ] : कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान व राज्यातील शाळेत सुधारित धोरण निश्चित करणे संदर्भात दिनांक 05 जून 2025 रोजी 02 स्वतंत्र महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आली आहे .

01 वेतन अनुदान : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 05 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सन 2025 – 26 या आर्थिक वर्षामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पीत करण्यात आलेला वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार , मान्यता देण्यात आलेली आहे .

सदरचा निधी हा माननीय आयुक्त  (शिक्षण ) महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण , जनजाती क्षेत्र उपयोजन , सर्वसाधारण माध्यमिक शाळा करिता सहाय्यक अनुदान , सैनिकी शाळा करिता सहाय्यक अनुदान , महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान , युवक कल्याण कार्यक्रम राष्ट्रीय छात्र सेना अशा विविध लेखाशीर्षा निहाय अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत .

02. अंशकालीन निदेशकांची नियुक्ती : स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्ती करणे व सुधारित धोरण निश्चित करणे संदर्भात शालेय शिक्षण विभाग कडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी वर्गाच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्ती करणे संदर्भात सुधारित धोरण निश्चित करण्यात आली आहे .

हे पण वाचा : या आठवड्यातील सर्व सरकारी नोकरी भरती जाहिराती पाहा सविस्तर..

यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या इयत्ता सहावी ते आठवी मधील आधार वैध असलेल्या किमान 100 विद्यार्थी संख्या किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असणाऱ्या शाळांमध्ये तीन अंशकालीन निदेशकांची पदे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार निर्धारित करण्यात येत आहे .

यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी

01. वेतन अनुदान  शासन निर्णय (PDF)

02. अंशकालीन निदेशक नियुक्ती शासन निर्णय (PDF )

WhatsApp Group Join Now

Leave a Comment