@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Revised government decision regarding issuance of sustainability certificate ] : कार्यालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या व 03 वर्षांची नियमित सेवा पुर्ण करणाऱ्या पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय प्राधिकारी / कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक वर्षात दि.30 नोव्हेंबर पर्यंत करण्याचे निर्देश आहेत .
तसेच सदर दिनांकापर्यंतची स्थिती दर्शविणारा वार्षिक अहवाल त्याच वर्षी दिनांक 15 डिसेंबर पुर्वी तयार करण्याचे तसेच सदर अहवालांमध्ये संबंधित कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची संवर्गनिहाय एकुण संख्या त्यापैकी स्थायित्व प्रमाणपत्र धारकांची संख्या , पात्र असणाऱ्या तथापि ..
स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्रमाणपत्र अद्याप न देण्यात आलेल्या अस्थायी प्रमाणपत्र धारकांची संख्या , पात्र असणाऱ्या तथापि स्थायित्व लाभ प्रमाणपत्र अद्याप न देण्यात आलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांची संख्या स्थायित्वसाठी विचार करण्यात आलेल्या तथापि विहीत अटींची पूर्तता होत नसल्यामुळे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र न देण्याचा जाणीवपुर्वक निर्णय आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरविण्याचे निर्देश आहेत .
पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्याचा नमूना सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- कुटुंबनिवृत्ती वेतन लाभाचे वारसांचा क्रम , निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंबनिवृत्तीवेतन बाबत सविस्तर माहीती !
- या राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये राज्य सरकारचे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणारे 03 आर्थिक लाभाची गणना ; जाणून घ्या सविस्तर .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !