आज दि.24 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 08 important cabinet decisions were taken in the cabinet meeting held today, June 24th ] : आज दिनांक 24 जुन रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मध्ये झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 08 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित घेण्यात आले आहेत .

01.शक्तीपीठ महामार्ग : पवनार ( वर्धा ) ते पन्नादेवी ( जि.सिंधुदुर्ग )  या महामार्गास मंजुरी देण्यात आली आहे . या महामार्गामध्ये साडेतीन शक्तीपीठे , 02 ज्योतिर्लिंग व अंबेजोगाई व पंढरपुर समवेत 18 तीर्थक्षेत्र जोडले जाणार आहेत . याकरीता 20,000/- कोटी रुपयांचा निधी वितरणास मंजूरी देण्यात आलेले आहे .

02.वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्ता मध्ये वाढ : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारा आहार , निर्वाह भत्ता तसेच वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता मध्ये मोठी वाढ करण्यास सदर मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे .

03.विद्युतगृह प्रकल्प कोयना धरण सुधारणांस प्रशासकीय मंजुरी ..

04.राज्य वस्तु व सेवा कर 2017 मध्ये सुधारणा करण्यास व आगामी अर्थसंकल्पिय अधिवशन मध्ये याबाबत विधेयक सादर करण्यास मंजूरी .

हे पण वाचा : डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक / क.सचिवालय सहाय्यक पदांच्या 3,131 जागेसाठी महाभरती !

05.महाराष्ट्र कर , व्याज ,विलंब शुल्क ( सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ) कंपनीच्या थकबाकीच्या तडजोडीकरीता सुधारणा विधेयक आणण्यास मंजूरी .

06.उच्च न्यायालय वांद्र पुर्व येथील आरक्षित असणाऱ्या भुखंड वरील विस्थापितांकरीता द्यावयाचे 31 कोटी 75 लाख रुपये शुल्क माफ करण्यास मंजूरी .

07.पिंपरी – चिंचवड पालिका प्रशासन मधील चिखली या भागातील दफनभुमी च्या 40 टक्के क्षेत्र मैला शुद्धीकरण केंद्र करीता वापरण्यास मंजूरी .

08. हुडको या संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या 2,000/- कोटी रुपयांच्या कर्जास राज्य सरकारकडून हमी देण्यास मंजुरी .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment